
सामना ऑनलाईन। मुंबई
पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राईक करणाऱ्या हवाई दलावर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच अभिनेत्री स्वरा भास्कर हीने मात्र मोदींवर उपहासात्मक टीका केली . यामुळे नाराज झालेल्या मोदी चाहत्यांनी तिला ट्रोल केलयं.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे संपू्र्ण मिशन मोदींच्या मार्गदर्शनाखाली झाले. यामुळे देशभरातील जनता मोदींवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पण स्वराला हेच खटकले आहे. तिने एका टि्वटमधून आपली ही खदखद व्यक्त केली आहे. हा तुमच्या कामाचाच एक भाग आहे ना ? कि यासाठी तुम्हांला वेगळे गुण मिळायला हवेत? असा सवाल तिने केला आहे. मोंदींवर स्वराने उगारलेले हे प्रश्नचिन्ह नेटकऱ्यांना रुचले नाही. त्यांनी स्वराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही यूजर्सने स्वराला विचारलं कि तू १८ तास काम करतेस का? नाही ना. कारण तुझ्याकडे तर कामचं नाही. तुला तर मोदी फोबिया झाला आहे. तर काहींनी तिला तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Part of the job, no? या इसके अलग से points मिलने चाहिए??!??? https://t.co/oaeJVi3TSw
— Swara Bhasker (@ReallySwara) February 27, 2019


























































