
सामना प्रतिनिधी । मुंबई
रिलायन्स एंटरटेनमेंटचे अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील च्या स्टीव्हन स्पीलबर्ग आणि पार्टिसिपंट मीडिया यांच्या संयुक्त उपक्रमाने ऍकॅडमी ऍवॉर्डसच्या सोहळ्यात चार पुरस्कारांवर नाव नोंदवून घसघशीत यश मिळवले. ’ग्रीन बुक’ या पीटर फॅरेली दिग्दर्शित सिनेमाने बेस्ट पिक्चर ऑफ द इअर हा मानाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. या चित्रपटासाठी माहेरशाला अली यांना बेस्ट सपार्ंटग ऍक्टर आणि निक वॅलेलोंगा, ब्रायन करी आणि पीटर फॅरेली यांना ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर देण्यात आला. रायन गॉसलिंग यांची भूमिका असलेल्या ’फर्स्ट मॅन’ या सिनेमाला बेस्ट व्हिज्युअल इफेक्टसाठीचा ऑस्कर देण्यात आला.
’ग्रीन बुक’ला 5 विभागांमध्ये नामांकने होती – बेस्ट पिक्चर, बेस्ट ऍक्टर (विगो मार्टेनसेन), बेस्ट सपार्ंटग ऍक्टर, बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले आणि बेस्ट फिल्म एडिटिंग. तर, ’फर्स्ट मॅन’ला 4 विभागात नामांकने होती – बेस्ट प्रोडक्शन डिझाइन, बेस्ट साऊंड एडिटिंग, बेस्ट साऊंड मिक्सिंग आणि बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स. ’रेडी प्लेअर वन’ला बेस्ट व्हिज्युअल इफेक्टसचे नामांकन होते. रिलायन्स एंटरटेनमेंटचे उपाध्यक्ष अमिताभ झुनझुनवाला यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

























































