
सामना प्रतिनिधी । सातारा
सातारा शहराजवळ असलेल्या पिरवाडी परिसरात एका अज्ञात युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृततेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल असून युवकाचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


























































