Lok Sabha 2019 ब्लॉगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे मतदान करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी चार आवाहन केले आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मोदींना आपल्या ब्लॉगमध्ये केले आहे.

मोदींनी ब्लॉगमध्ये म्हणाले की, “निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावून देशाच्या विकासात हातभार लावावा. जर कोणी मतदान नाही केले तर त्या व्यक्तीला पश्चाताप झाला पाहिजे असे वातावर निर्माण करूया.”

मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये चार आवाहन केले आहे. आपले नाव मतदान यादीत समाविष्ट करणे, मतदार यादीतील आपले नाव तपासणे, मतदानाच्या दिवशीच्य कामाचे नियोजन आणि मतदानासाठी दुसर्‍याला प्रेरित करणे असे चार आवाहन मोदींनी केले आहे. तसेच 2019 च्या निवडणूका विशेष असल्याचे मोदींनी म्हटले आहे. कारण 21 व्या शतकात जन्मलेल्या पिढीला मतदानाचा हक्क मिळणार असल्याचे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.