
सामना प्रतिनिधी । मुंबई
बेकायदा होर्डिंगवरून मुंबई उच्च न्यायालयाने आज भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. प्रभागात कुणीही बेकायदेशीर होर्डिंग लावल्यास नगरसेवक या नात्याने तुम्हीच तक्रार केली पाहिजे. त्यासाठी यंत्रणा उभारली पाहिजे, अशा शब्दांत झापत हायकोर्टाने पटेल यांना जाब विचारला.
मुरजी पटेल व केसरबेन मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे अंधेरीतील पालिका मैदानाबाहेर व फुटपाथवर बेकायदा होर्डिंग व बॅनर काढण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांसोबत गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली होती.


























































