
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानच्या सलामीवीरांच्या कामगिरीत सातत्य नाही. चौथ्या क्रमांकाचा शोध अद्याप संपलेला नाही. तरीही टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणतोय, वर्ल्ड कपसाठी आमचा संघ तयार आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलटी आहे. त्यामुळे ‘आयपीएल’मधील खेळाडूंच्या कामगिरीकडे नजरअंदाज करून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, मी जास्त पुढचा विचार करीत नाही. सध्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी कंबर कसलीय. त्यानंतर आपोआपच वर्ल्ड कपचे तिकीट बुक होईल असा विश्वासही पुढे त्याने व्यक्त केलाय.
क्रिकेटपटूला कोणत्याही स्पर्धेत आपली धमक दाखवायचीच असते. मग ती आयपीएल असो किंवा वर्ल्ड कप. धावा करून संघाला विजय मिळवून देण्यासाठीच फलंदाज सर्वस्व पणाला लावत असतात. त्यामुळे वर्ल्ड कपचा दबाव मी घेत नाही. सध्या राजस्थान रॉयल्ससाठी दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे, असे अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला.
आयपीएलमध्ये जीएसटी चोरी
स्टेट डायरेक्ट्रेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्सने (एसडीआरआय) आयपीएल स्पर्धेत तिकिटांतून झालेली 11.62 कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे. राजस्थान रॉयल्स संघाने एसएमएस स्टेडियमवर 11 एप्रिल ते 19 मे 2018 दरम्यान एकूण सात सामन्यांचे आयोजन केले होते. या सामन्यांतील ही जीएसटी चोरी पकडण्यात आली आहे. मेसर्स रॉयल मल्टी स्पोर्टस् प्रा. लि. फ्रेंचायजी कंपनीने ही जीएसटी चोरी केली आहे. या सामन्यांतील तिकिटे ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावरून विकण्यात आली.
आयपीएलचे संपूर्ण केळापत्रक सोमवारी जाहीर होणार?
इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल) 12 क्या मोसमाचे संपूर्ण केळापत्रक लककरच जाहीर होणार आहे. लोकसभा निकडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) युद्धपातळतीवर आमले काम सुरू केले असून सोमकारी ‘आयपीएल’चे संपूर्ण केळापत्रक जाहीर करण्याची शक्यता कर्तविण्यात येत आहे.


























































