हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व शिवसेना-भाजपला बांधून ठेवते – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । नाशिक
शिवसेना-भाजप युती केली तेव्हा प्रत्येक विभागात जाऊन दोन्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे ठरले होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या मेळाव्यामध्ये म्हणाले. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा धागा शिवसेना-भाजपला बांधून ठेवते, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
24 तारखेला महायुतीची पहिली सभा होणार आहे. युतीने हुंकार भरला असल्याने समोरचे गांगरले आहेत. आमच्या युतीमुळे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आमची युती 30 वर्षांपासून आहे, ‘ये फेव्हीकॉलका मजबूत जोड है, ये तुटने वाला नही है’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकायच्याच असा हुंकार भरला. तसेच केंद्रातील आणि राज्यातील सरकारने सामान्यांसाठी काम केल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हागणदारी मुक्त योजना, जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान योजनेचाही उल्लेख केला.
विरोधकांना झोडपले
मध्यंतरी देशामध्ये 22 पक्षांनी मिळून युती केली आणि ते सर्व बंगालमध्ये गेले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत एकत्र हात वर करून ‘हम साथ साथ है’च्या घोषणा केल्य. परंतु तिथून बाहेर पडल्यानंतर सपा-बसपाने काँग्रेसला म्हटले ‘हम आपके है कौन’ आणि काँग्रेसने दिल्लीमध्ये आपला म्हटलं ‘हम आपके कौन है’. आता ते एकमेकांना कसे पराभूत करता येईल यासाठी काम करत आहेत. तसेच विरोधकांचे महागठबंधन नाही तर महाठगबंधन असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. या सारखी आमची युती नसून हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी लढण्यासाठी आम्ही एकत्र असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
एकीकडे एनडीए आणि युतीकडे राष्ट्रवाद हा मुद्दा आहे तर दुसरीकडे काही पक्ष आमच्या सैन्यावर, लष्कराच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. शौर्याचा पुरावा मागितला जातो तेव्हा शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्याला काय वाटत असेल, त्यामुळे सैन्याकडे पुरावा मागणाऱ्यांना जनता निवडून देईल का, तर नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आदरार्थी संबोधणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी आसून ओढले.