Lok Sabha 2019 भाजपच्या केंद्रिय निवड समितीची बैठक सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी भाजपच्या केंद्रिय निवड समितीची तिसरी बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर भाजप पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील 25 विद्यमान खासदारांची तिकीट कापली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

छत्तीसगडमध्येही 1० विद्यमान खासदारांना डच्चू मिळणार असून पक्ष नवी चेहर्‍यांना संधी देणार असल्याचे महासचिव अनिल जैन यांनी सांगितले. एकून 11 नवीन चेहर्‍यांना आगामी लोकसभेत संधी देणार असल्याचे जैन यांनी सांगितले.

भाजपच्या केंद्रिय निवड समितीची मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत ही बैठक पार पडली झाली. भाजपध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, नितीन गडकरीसंह दिग्गज उपस्थित होते. त्या बैठकीत उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरातसह 12 राज्यांच्या उमेदवारांवर चर्चा केली.