
सामना ऑनलाईन । लंडन
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा आगामी विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर तो टी-20 तूनही निवृत्ती घेणार आहे. मलिंगाने स्वत: आज याबाबत घोषणा केली.

सेंच्युरियन मैदानावर श्रीलंका व दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी-20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला. त्या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना मलिंगाने ही घोषणा केली. ‘विश्वचषकानंतर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. पण मला टी-20 चा विश्वचषक खेळायचा असल्याने पुढील वर्षी होणारा हा विश्वचषक खेळून मी पूर्णपणे निवृत्त होणार’, असे मलिंगाने सांगितले.

























































