लातूर मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज वैध, चार उमेदवारांचे अर्ज रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर लोकसभा मतदार संघासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या नियंत्रणाखाली व निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण रिशीरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीमध्ये नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. यामध्ये एकूण 15 उमेदवारांच्या 27 नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन 11 उमेदवारांचे 21 अर्ज वैध ठरले. तर चार उमेदवारांचे सहा अर्ज अवैध ठरले या चार पैकी तीन उमेदवारांची उमेदवारीही अवैध ठरविण्यात आलेली आहे.

वैध अर्जामध्ये 1) रमेश निवृत्ती कांबळे, अपक्ष 2) सुधाकर तुकाराम श्रृंगारे, भाजपा 3) सिध्दार्थकुमार दिगंबर सुर्यवंशी, बसपा 4) अरुण रामराव सोनटक्के, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 5) दत्तु प्रभाकर करंजीकर, बहुजन मुक्ती पार्टी 6) रामराव नरसिंग गारकर, वंचित बहुजन आघाडी, 7) मधुकर संभाजी कांबळे, अपक्ष 8) कामंत मच्छिंद्र गुणाजी उर्फ गुणवंतराव , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 9) मिलींद हरिभाऊ कांबळे , अपक्ष 10) पपिता रावसाहेब रणदिवे, अपक्ष 11) मिलींद गणपत महालिंगे , अपक्ष 12) रुपेश शामराव शंके, स्वतंत्र भारत पक्ष.

अवैध अर्जामध्ये 1) दोरवे संजय सिताराम, भारतीय जनता पार्टी 2) विकास सतिष कांबळे, वंचित बहूजन आघाडी 3) भगवान धोंडिबा कुमठेकर, सोशित बहुजन आघाडीसह शिव लहू भिम आर्मी या तीन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने उमेदवारी ही अवैध ठरली. तर मधुकर संभाजी कांबळे,अपक्ष यांचा एक अर्ज वैध व एक अवैध झालेला आहे. त्यामुळे छाननी अंती एकूण 12 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरवण्यात आलेली आहेत, असे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.