Lok Sabha 2019 शरद यादव मधेपुरामधून, तर मीसा भारती पाटलीपुत्रमधून रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये महाआघाडीच्या जागावाटपानंतर राजदने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. सपाचे माजी नेते शरद यादव हे राजदच्या तिकिटावर मधेपुरामधून निवडणूक लढवणार असून, लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती या पाटलीपुत्र लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने जागावाटप जाहीर केले आहे. बिहारमध्ये राजद 20 जागांवर तर काँग्रेस 9, हिंदुस्थानी आवाम मोर्चा 3, राष्ट्रीय लोक समता पार्टी 5, वीआईपी 3, सीपीआय 1 जागेवर निवडणूक लढवणार आहे.

काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर

काँग्रेसने देखील आणखी बिहारमाधील उमेदवारांची आणखी एक यादी प्रसिद्ध केली आहे. माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या सासाराम मधून निवडणूक लढवणार आहेत. तर सुपोलमधून रंजीत रंजन, समस्तीपुरमधून अशोक कुमार, तसेच मुंगेरमधून नीलम देवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.