अर्थ अवरनिमित्त आज एक तास वीज बंद ठेवा; अदानी इलेक्ट्रिसिटीचे ग्राहकांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पर्यावरण संवर्धनासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आपल्या 27 लाख वीज ग्राहकांनी ‘अर्थ अवर’ उपक्रमांतर्गत शनिवारी सायंकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत एक तास वीज वापर स्वेच्छेने बंद ठेवावा, असे आवाहन केले आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून 180 देश एकत्र येऊन ‘अर्थ अवर’ या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत. त्याची दखल घेत अदानी इलेक्ट्रिसिटीनेही आपले ग्राहक, भागधारकांना ‘अर्थ अवर’ पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे विजेची बचत होणार असून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे. विक्रमी उष्म्यामुळेच 2016 या वर्षाची ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ म्हणून नोंद झाली आहे. तापमानातील ही वाढ अशीच वाढत राहिली तर पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास होईल असा इशारा याआधीच जागतिक हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.