इंडिया ओपन बॅडमिंटन; श्रीकांत जिंकला, कश्यप हरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी विजेता किदाम्बी श्रीकांतने तब्बल 17 महिन्यांनंतर फायनलमध्ये प्रवेश केला. हिंदुस्थानच्या या स्टार खेळाडूने चीनच्या हुआंग युझियांगला नमवत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली. पारुपल्ली कश्यपला मात्र सेमी फायनलचा अडथळा ओलांडता आला नाही. त्याला व्हिक्टर एक्सलसेनकडून हार सहन करावी लागली.

किदाम्बी श्रीकांतने उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या हुआंग युझियांगवर 16-21, 21-14, 21-19 अशा फरकाने विजय मिळवला. दरम्यान, व्हिक्टर एक्सलसेनने हिंदुस्थानच्या पारुपल्ली कश्यपला 21-11, 21-17 अशा फरकाने पराभूत केले.

सिंधूचे आव्हान संपुष्टात

पी. व्ही. सिंधूचे इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या बिंगजिओ ही हिने पी. व्ही. सिंधूवर 23-21, 21-18 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत एण्ट्री मारली.