स्वतंत्र पंतप्रधान, राष्ट्रपती असलेला कश्मीर पुन्हा बनवू, ओमर अब्दुल्ला बरळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा फुटीरतावादाला खतपाणी मिळेल असे वक्तव्य केले आहे. पूर्वी आपले स्वतंत्र पंतप्रधान राष्ट्रपत्री आणि संविधान होते तसे राज्य आपण पुन्हा आणू असे वक्त्यव्य अब्दुल्ला यांनी केले आहे. एका सभेत ते बोलत होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “कश्मीर आपल्या अटींवर हिंदुस्थानमध्ये सामील झाला होता. इतर संस्थानं हिंदुस्थानमध्ये बिनशर्त सामील झाले होते. आपण अटी ठेवल्या की, आपला झेंडा वेगळा असेल, आपली ओळख कायम राहिल, आपले संविधान वेगळे असेल, आपला झेंडा असेल अशा आपल्या अटी होत्या.” असे अब्दुल्ला म्हणाले. तसेच “आज आपल्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारे हल्ले होत आहेत. जम्मू कश्मीरची मूळ ओळख पुसण्यासाठी मोठी ताकद कार्यरत आहे. कालच अमित शहा म्हणाले की, २०२० पर्यंत कश्मीरचे ३५ ए कलम हटवू. त्यापूर्वी केंद्रिय अर्थमंत्री जेटली यांनी ३७० हटवले जाईल अशी धमकी दिली होती.” परंतु आपला वेगळी ओळख असणार, आपले संविधान असणार, तेव्हा आपल्या राज्याचा आपला पंतप्रधान असणार, पूर्वी तसे होते आणि तसे राज्य आपण पुन्हा आणू असे अब्दुल्ला म्हणाले.