उमेदवारी दिली मात्र एबी फॉर्मचा अद्याप पत्ता नाही, सुभाष झांबडांबाबत सस्पेंस कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी, नांदेड

महाराष्ट्रामध्ये जनता दल सेक्युलरने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी हातमिळवणी करत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यासंदर्भातील घोषणा मंगळवारी नांदेडमध्ये करण्यात आली.  जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील यांनी एक पत्रकार परीषद घेतली.  पत्रकार परिषदेतल बोलताना पाटील म्हणाले की  जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जनता दल सेक्युलरने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. पाटील यांच्या निर्णयाचे अशोक चव्हाणांनी स्वागत केले. या पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी आमदार अब्दुल सत्तार यांनी अजून काँग्रेस सोडली नसल्याचे सांगितले. संभाजीनगरात काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांना अजूनही ‘एबी’ फॉर्म देण्यात आलेला नाहीये. बी फॉर्मबाबतचा निर्णय 4 तारखेला होणार आहे. तेव्हा उमेदवाराबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे चव्हाण यांनी सांगितले.