
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यावर विरोधी पक्ष काँग्रेसने विरोध दर्शवला होता. मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयानेही चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला होता. आता हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. नवीन प्रदर्शनाच्या तारखेचा पोस्टरही निर्मात्यांनी जारी केला आहे.
Thank you to each and every one of you for your blessings, love and support. Thank you to the Indian Judiciary. We hope you like the film and that it inspires you all! #PMNarendraModi Jai Hind @OmungKumar @sandip_Ssingh @sureshoberoi @anandpandit63 @TSeries pic.twitter.com/ogAKP1jG77
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) April 5, 2019
पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट पीएम नरेंद्र मोदी हा कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. न्यायालय आणि निवडणूक आयोगाने या चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यात मोदींच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटाला काँग्रेसनेही विरोध केला होता. अखेर चित्रपटाला सेन्सॉरचेही प्रमाणपत्र मिळाले असून 11 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका नवीन टॅगलाईसह एक पोस्टर रीलीज करण्यात आले आहे. देशभक्ति ही इस चौकीदार शक्ती है असे या पोस्टरवर म्हटले आहे.
Thank you everyone for your support. Here’s the date when our film #PMNarendraModi will be releasing. 11th April. Jai hind pic.twitter.com/rY08rUhv7W
— Omung Kumar B (@OmungKumar) April 5, 2019























































