Video- पिंपरीत भंगाराच्या गोदामांना भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पिंपरी

पिंपरीतील कुदळवाडी येथे भंगाराच्या 4 गोदामांना भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गोदामांमध्ये ज्वालाग्राही पदार्थ असल्यामुळे आग अधिकच भडकत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस सिलिंडर बाहेर काढले आहेत. आग विझवण्यासाठी खासगी कंपन्यांचे बंब आणि पाण्याचे टँकरची देखील मदत घेतली जात आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली असून अद्याप आग आटोक्यात आलेली नाही.