टाटा चॅम्पियन आरसीएफ टी-20 क्रिकेट स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ः टाटा स्पोर्टस् क्लब संघाने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात फ्युचर ग्रुप संघावर दोन धावांनी विजय मिळवून जेतेपदावर आपले नाव कोरले. चेंबूरच्या आरसीएफ कॉलनी ग्राऊंडवर हा सामना पार पडला. कर्णधार अक्षय दरेकरने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फ्युचर ग्रुपच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून 11 व्या षटकातच टाटा स्पोर्टस् क्लबची अवस्था ही 8 बाद 47 अशी केली, पण विशाल दाभोळकरने तीन चौकारांसह 34 चेंडूंत 27 धावा केल्याने संघाला 19.1 षटकांत 94 धावसंख्येपर्यंत तरी पोहचता आले. फ्युचर ग्रुपचा संघ 19.4 षटकांत 92 धावांवर आटोपला.