
सामना ऑनलाईन । ठाणे
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग येणार असून कल्याणमध्ये 32 , भिवंडीत 18, पालघरमध्ये 31 तर ठाण्यात 25 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 13 अर्ज छाननीत अवैध ठरले असून 12 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या कल्याणमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत. कल्याण मतदारसंघात 32 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील चौघांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. ठाण्यातदेखील 25 जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी चौघांचे अर्ज अवैध ठरले आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात फक्त एक अर्ज अवैध ठरविण्यात आला.






























































