
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. ठिकठिकाणी सकाळपासून मतदानासाठी रांगा दिसून आल्या. दुपारी उन्हाच्या तडाख्यातही मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसले. देशातील 18 राज्यात आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 91 जागांसाठी मतदान पार पडले. सोशल मीडियावरही निवडणुकीचा रंग चढल्याचे यावेळी दिसून आले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी मतदान पार पडले. यावेळी तब्बल जगभारतील तब्बल 45.6 मिलियन (450 लाख) लोकांनी निवडणुकीसंदर्भात ट्वीट केले आहे. याची माहिती ट्विटर इंडियाने शेअर केली आहे. मतदानाचे फोटो, मतदानानंतरचे फोटो, तसेच उमेदवारांबाबत भाकितं यासह अन्य संदर्भात हे ट्वीट करण्यात आले आहेत.
The first phase of the #LokSabhaElections2019 has Twitter buzzing with conversation. 45.6M Tweets were recorded from India and across the globe. pic.twitter.com/VpBnGy9DRU
— Twitter India (@TwitterIndia) April 11, 2019
नेटिझन्सने सर्वाधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात ट्वीट केले आहेत.
By the end of phase one, the most talked about national leaders on the platform were @narendramodi, @amitshah, @myogiadityanath, @rahulgandhi and @priyankagandhi. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/vQL8ucguIF
— Twitter India (@TwitterIndia) April 11, 2019
तसेच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून देशाची सुरक्षितता हा मुद्दा सर्वात जास्त ट्वीटमध्ये वापरला गेला. यानंतर धर्म, रोजगार, शेती आणि कर व व्यापार हे मुद्दे चर्चिले गेल्याचे ट्विटर इंडियाने सांगितले आहे.
In the last month, the top conversation topic for #LokSabhaElections2019 on Twitter was national security, followed by religion, jobs, agriculture, and taxes and trade. pic.twitter.com/QRxJtW7Cl0
— Twitter India (@TwitterIndia) April 11, 2019

























































