सामना ऑनलाईन । अमरावती
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली सभा. या सभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे..
- विकसीत देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना-भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या – मुख्यमंत्री
- ही निवडणूक जशी विकासाची तशी राजकीय अस्मितेची देखील आहे – मुख्यमंत्री
- स्वातंत्र्यापासून वीज न पाहिलेल्या गडचिरोलीतील अनेक गावांपर्यंत आमच्या सरकारने वीज पोहोचवली – मुख्यमंत्री
- सिंचनाची, रस्त्यांची कामं वेगाने सुरु आहेत – मुख्यमंत्री
- गेल्या वीस वर्षापासून रखडलेलेले प्रकल्प पूर्णत्वाकडे गेले – मुख्यमंत्री
- थेट मदतीसह सरकार आल्यास शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची योजना मोदींनी आणली – मुख्यमंत्री
- शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय मोदींनी घेतला – मुख्यमंत्री
- शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6 हजार टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला – मुख्यमंत्री
- मुख्यमंत्र्यांनी वाचला विविध योजनांचा पाढा
- मोदींनी ”ना खाऊंगा ना खाने दुंगा” घोषणा केली आणि दिल्लीहून निघालेला 1 पैसासुद्धा थेट गरिबांपर्यंत पोहोचू लागला – मुख्यमंत्री
- राजीव गांधी म्हणायचे दिल्लीहून एक रुपया निघाला की गरिबांपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे भ्रष्टाचार, दलाल खात होते – मुख्यमंत्री
- काँग्रेसचे जम्मू-कश्मीरमधील सवंगडी देशात दोन पंतप्रधानांची भाषा करत आहेत – मुख्यमंत्री
- सैन्याच्या शौर्याचा पुरावा काँग्रेस पक्ष मागत होता – मुख्यमंत्री
- आता हा देश चर्चा करणारा नाही, तर घरात घुसून ठोकणारा आहे – मुख्यमंत्री
- हे मोदींचे सरकार आहे. आमच्या देशात घुसाल तर तुम्हाला घरात घुसून मारू – मुख्यमंत्री
- मोदींनी सैन्याला खुली सूट दिली आणि सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला – मुख्यमंत्री
- पाकिस्तानमध्य़े घुसून ठणकावण्याची धमक त्या सरकारमध्ये नव्हती – मुख्यमंत्री
- 2008 मध्ये मुंबईत हल्ला झाला तेव्हा विरोधकांनी काय केले? फक्त तीव्र निषेध केला – मुख्यमंत्री
- सैन्याचे अधिकार कमी करणारा काँग्रेसचा जाहीरनामा – मुख्यमंत्री
- काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम 124 रद्द करण्याचा उल्लेख, मुख्यमंत्र्यांची कडाडून टीका
- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी म्हणजे महाठगबंधन – मुख्यमंत्री
- आम्ही जप्त केलेल्या काळा पैशातून काँग्रेस पैसे वाटणार का? – मुख्यमंत्री
- गरिबांना राहुल गांधी 72 हजार देणार कुठून?- मुख्यमंत्री
- मुख्यमंत्र्यांची काँग्रेसच्या ”न्याय” योजनेवर टीका
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात





























































