
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच 20 रुपयांची नवीन नोट चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर या नोटेचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला.
हिरवट पिवळ्या रंगाची नवीन 20 रुपयांची नोट असून समोरील बाजूस महात्मा गांधीजींचे छायाचित्र आहे. नोटेच्या मागील बाजूस महाराष्ट्रातील वेरूळ लेणीचे चित्र आहे. सांस्कृतिक वारसा असलेल्या वेरूळच्या कैलास लेणीचे हे चित्र आहे. नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी आहे. नवीन नोट चलनात आल्यानंतर सध्या बाजारात असलेल्या 20 रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात राहणार आहेत.






























































