
सामना प्रतिनिधी, पिंपरी
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कुणी दुबईवरून आले तर कुणी अमेरिकेहून. पण, मतदान केलेच. बहारीनच्या रसिका जोशी यादेखील बहारीनवरून निगडी येथे मतदानाला आल्या. गेल्या लोकसभेतही त्यांनी मतदान केले होते. पण, यावेळी त्यांचे नावच मतदार यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे त्यांना मतदानच करता आले नाही.
हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी आलेल्या जोशी यांना निराश होऊन मतदान केंद्रावरूनच परतावे लागले. पुण्यात मावळ आणि शिरूर या दोन मतदारसंघांत मतदान पार पडले. यंदा देखील त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हिंदुस्थानात आल्या. निगडी येथील शिवभूमी विद्यालयात त्यांचे मतदान होते. गेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांना त्यांनी तेथेच मतदान केले होते. यंदा मात्र त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.






























































