
सामना प्रतिनिधी । लातूर
रिक्षाचालकासह दोन अज्ञात व्यक्तींनी शहरातील दिपज्योतीनगर भागातील प्रवाशास मारहाण करून त्याचा मोबाईल, सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा एकूण 47 हजार रुपयाचा ऐवज लुटला.
या प्रकरणी रामराव विठ्ठल बालुरे (65) रा. दिपज्योतीनगर लातूर यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रिक्षाचालक व इतर दोन अज्ञात इसमांनी फिर्यादीस जुना रेणापूर नाका येथे सोडतो सांगून गल्लीबोळात घेऊन गेले. तिथे प्रवाशाला दमदाटी करून त्याच्या जवळील विवो मोबाईल ( 13000 ), १ तोळ्याची सोन्याची अंगठी ( 30,000 रुपये) व पँटच्या खिशातील 8000 रुपये असा एकूण 47000 रुपयाचा ऐवज घेऊन लंपास झाले. या प्रकरणी रिक्षाचालक व अज्ञात दोघांविरुध्द गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी गोसावी हे करीत आहेत.
































































