
सामना ऑनलाईन । बार्सिलोना
एजॅक्सने बुधवारी टोटेनहॅम हॉटस्परला पराभूत करीत फायनलच्या दिशेने वाटचाल केल्यानंतर गुरुवारी बार्सिलोनाने लिव्हरपूलचा सेमी फायनलच्या पहिल्या लेगमध्ये 3-0 असा धुव्वा उडवला. लियोनेल मेस्सीचे दोन गोल व लुईस सुआरेझचा एक गोल या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. लियोनेल मेस्सीने बार्सिलोनासाठी 600 गोल करण्याचा पराक्रमही केला.
लुईस सुआरेझने 26 व्या मिनिटाला गोल करीत बार्सिलोनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात लियोनेल मेस्सीने 75 व 82 व्या मिनिटाला गोल करीत लिव्हरपूलच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. मेस्सीचा बार्सिलोनासाठीचा 600 वा गोल तमाम फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी ठरला. त्याने 25 यार्डावरून फ्री किकवर केलेला गोल डोळय़ांचे पारणे फेडणार ठरला.



























































