घरणी पांढरवाडी प्रकल्पावरील अवैद्य पाणी उपसा बंद; विद्युत मोटारी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरूरअनंतपाळ

घरणी व पांढरवाडी प्रकल्पावरील असलेल्या डि. पी. रोहित्रावरील विद्युत पुरवठा खंडीत करुन अवैद्य पाणी उपसा करणार्‍या विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या.

शिरूर आनंतपाळ तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पात सध्या ९.०३ % टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. घरणी प्रकल्पावर शिवपुरातील ९ खेडी, शिरूरअनंतपाळ शहरासह पाणी पुरवठा योजना व आटोळातील १७ खेडी पाणी पुरवठा योजना, थेरगाव, कारेवाडी, धामणगाव पाणी पुरवठा योजनेचा घरणी प्रकल्पातून पिण्यासाठी पाण्याचा उपसा चालू आहे.

शिरूरअनंतपाळ तालुक्यातील दहा गावांची पाणी टंचाई निवारण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याची मागणी आहे. तसेच पांढरवाडी लघु प्रकल्पातून येरोळ व पांढरवाडी साठी पाणी पुरवठा योजनेची जुलै अखेर राखुन ठेवण्यासाठी ग्रामपंचायतची मागणी आहे.

प्रकल्पातील पाणी साठे दहा टक्केच्या आत आल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी लातुर यांच्या आदेशाने तहसिलदार शिरुरअनंतपाळ व चाकूर यांच्या मार्फत दक्षता पथकाद्वारे घरणी व पांढरवाडी प्रकल्पावरील अवैद्य पाणी उपसा करणार्‍या विद्युत मोटारी जप्त करून कार्यवाही करण्यात येत आहे .

दहा मे रोजी पांढरवाडी तलावातून तीन मोटारी जप्त करण्यात आल्या तर घरणी मध्यम प्रकल्पातील डी पी वरील विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याची माहीती तहसिलदार अतुल जटाळे यांनी दिली आहे. तरीही शेतकर्‍यांनी चोरून अवैद्य पाणी उपसा केल्याचे आढळल्यास पाणी टंचाई दक्षता समिती मार्फत मोटारी जप्त करण्यात येतील, असे तहसिलदार अतुल जटाळे यांनी सांगितले.