श्रीलंकेत जातीय हिंसाचार उसळला, देशभरात संचारबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोलंबो

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर आता जातीय हिंसाचाराचा आगडोंब उसळायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुस्लिम वस्त्या, मशिदी आणि दुकानांवर हल्ले होऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर फक्त चार शहरांमध्ये असलेली संचारबंदी वाढवून सोमवारपासून देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. रात्री 9 वाजल्यापासून दुसऱया दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत अशी आठ तास संचारबंदी लागू राहणार आहे. दरम्यान, तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.

श्रीलंकेत इसिस आणि स्थानिक दहशतवादी संघटना तौहिद जमात यांनी 21 एप्रिलला घडवून आणलेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंका हादरली. त्यानंतर बहुसंख्याक सिंहली आणि ख्रिश्चनांनी मुस्लिमांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर बंदी
तणाव लक्षात घेता आणि अफवा रोखण्यासाठी सोशल मीडियावर सरकारने बंदी घातली आहे. फेसबुक, व्हॉटस्ऍप, व्हिबर, आयएमओ, स्नॅपचॅट, इस्ट्राग्राम आणि यू टय़ूब यावर बंदी घालण्यात आली आहे.

पोलीस, लष्कराची बघ्याची भूमिका
कोट्टामपिटिया भागात मुस्लिमांची दुकाने आणि मशिदी जाळण्यात आल्या. शेकडो दंगलखोरांनी आमच्या दुकानांवर आणि मशिदींवर हल्ला करून त्या जाळल्या, पण दंगेखोरांना पांगवण्याऐवजी पोलीस आणि लष्कराने बघ्याची भूमिका घेतली. आम्ही घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी आम्हाला रोखले असे या भागातील स्थानिक मुस्लिमांचे म्हणणे आहे.

तुमच्यावर रडण्याची पाळी येईल!

दहशतवाद्यांनी घडवलेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर देशात मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण होण्यास तेथे सुरुवात झाली आहे. त्यातच ‘आम्हाला कुणीही रडवू शकत नाही’ अशा आशयाची पोस्ट अब्दुल हमीद या तरुणाने फेसबुककर टाकली होती. त्यावर दुसऱया एकाने ‘जास्त हसू नका, तुमच्याकर रडण्याची पाळी येईल’ असे उत्तर दिले. त्यावरून सोशल मीडियावर वाद पेटलाच पण त्यासोबत त्याचे पडसाद रस्त्यांवर दिसून आले. यानंतर संतप्त जमावाने तीन मशिदी आणि मुस्लिमांना लक्ष्य करत दुकानांवर हल्ले केले. फेसबुककर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱया अब्दुल हमीद मो. हसमर या तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती श्रीलंका पोलीस प्रकक्ते रुकान गुणशेखर यांनी दिली.