
सामना ऑनलाईन। जम्मू
जम्मू दहशतवादाचे जाळ पसरण्याच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर ए तोयबाच्या दोघा दहशतवाद्यांना सोमवारी अटक करण्यात आली.
पुलवामातील अवंतीपोरा येथील शौकत अहमद शेख आणि कुलगावमधील तावील मोईद्दीन दर अशी या दोघांची नावे आहेत. पोलीस आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स व 9 पॅरामिलिटरीकडून राबवण्यात आलेल्या संयुक्त शोधमोहिमेत त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक एके-47, मॅगझीन आणि 8 हजाराची रोकड जप्त करण्यात आली.


























































