
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
शेवटच्या टप्प्यातील मतदान होण्याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य केला. दिल्लीतील सर्वच्या सर्व जागा जिंकू असे वाटले होते, पण अखेरच्या क्षणी डाव पलटला. ऐनवेळी मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला साथ दिल्याची खंत केजरीवाल यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.
दिल्लीतील सातही जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार विजयी झाले असते, पण शेवटच्या क्षणी मुस्लिम समाजाची मते काँग्रेसकडे वळली. दिल्लीत 12 ते 13 टक्के मुस्लिम मते आहेत. निवडणुकीच्या एक दिवस आधी असे काय घडले की ‘आप’ला मिळणारी मते दुसऱ्या पक्षाकडे गेली हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे केजरीवाल म्हणाले. या परिस्थितीत ‘आप’च्या किती जागा निवडून येतील याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही.


























































