जिंकलो नसलो तरी हरलेलो नाही, शरद पवार यांची इन्स्टाग्रामवर पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar-new

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कच खाल्ली असली तरी, जिंकलो नसलो तरी हरलेलो नाही अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना नवी चेतना देण्याचा आज प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱया दिवशी शरद पवार यांनी राज्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही दुष्काळी भागाच्या भेटी सुरू केल्या. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. मावळमधून पार्थ पवार यांचा पराभव झाला पण कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शरद पवार यांनी जिंकलो नाही तरी हरलो नाही. सातारा जिल्हय़ातील कोरेगाव, नागेवाडीतील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संकट आले तरी नाउमेद व्हायचे नसते, संकटाने खचून जायचे नसते अशा शब्दांत द्ष्काळग्रस्त भागातील जनतेला संदेश देत त्यांनाही मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला.