
सामना ऑनलाईन । सिवनी
मध्य प्रदेशातील सिवनी येथे संशयित गोरक्षकांनी गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका महिलेसह तिघांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल साइटस्वर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी पाच हल्लेखोर आणि गोमांस बाळगणारे तिघे अशा सहाजणांना अटक केली आहे. दुंडा सिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंडला रोड येथे 22 मे रोजी ही घटना घडली.याप्रकरणी पाचजणांवर दुंडा सिवनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक ललित शाक्यवार यांनी सांगितले. सिवनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात पाच आरोपींना हजर केल्यावर त्यांना आज न्यायालयीन कोठडी देण्यात आली.





























































