विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prof. venkatesh abdev vhp

सामना ऑनलाईन । पुणे

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव (वय 64) यांचे सोमवार, 27 मे रोजी पुण्यातील कात्रज येथील राहत्या घरी रात्री 11 वाजता निधन झाले.

प्रा. आबदेव मागील चार वर्षांपासून आजारी होते. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी दुपारी पुणे येथे होणार आहे. प्रा. व्यंकटेश आबदेव हे मुळचे रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजीरा येथील असून प्राध्यापक म्हणून नोकरी करत असतांना विहिंपच्या कामासाठी 1994 साली स्वेच्छा निवृत्ती घेवून ते पूर्णवेळ बाहेर पडले. सुरुवातीला विहिंप महाराष्ट्र प्रांत मंत्री, क्षेत्रिय मंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

एक हसतमुख व्यक्ती, संघटन कौशल्य आत्मसात केलेला, सर्वच क्षेत्रात व्यापक संपर्क असलेला कार्यकर्ता म्हणून संपूर्ण देशात त्यांचा परीचय होता.