धोनी झाला बांगलादेशचा कर्णधार, फलंदाजी करताना फिल्डिंग लावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | मुंबई

हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आपण अनेकवेळा कर्णधार विराट कोहली याला मैदानावर मार्गदर्शन करताना पाहिले आहे. मग ते क्षेत्ररक्षण असो, कोणत्या क्षणी कोणत्या गोलंदाजाचा वापर करणे असो किंवा डीआरएसचा वापर असो, धोनी कायमच विराटला सल्ला देत असतो. तसेच यष्टीमागून गोलंदाजांना देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास मार्गदर्शन करताना पाहिले आहे. परंतु मंगळवारी बांगलादेश विरुद्ध झालेल्या सराव लढतीत धोनी चक्क बांगलादेशचा कर्णधार झाला आणि त्यांची फिल्डिंग लावली.

युवीपुढे भज्जी, कुंबळेही फेल; वर्ल्डकपमध्ये गोलंदाजीत नोंदवला अनोखा विक्रम

महेंद्रसिंग धोनी मैदानात फलंदाजीला असताना त्याने चक्क बांगलादेशची फिल्डिंग लावली. फलंदाजीवेळी धोनीच्या लक्षात आले की बांगलादेशने चुकीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केले आहेत. तेव्हा त्याने गोलंदाजाला क्षेत्ररक्षणात बदल करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे बांगलादेशने धोनीने सांगितल्याप्रमाणे बदलही केला. सामन्याच्या 39 व्या षटकात धोनी फलंदाजी करताना फिरकीपटू शब्बीर रहमान गोलंदाजी करत होता. तेव्हा रनअप घेणाऱ्या शब्बीरला धोनीने थांबवलं. धोनीने शब्बीपला सांगितलं की, मिड विकेटला असलेला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला उभा कर . धोनीच्या सल्ल्यानंतर बांगलादेशने त्यांच्या क्षेत्ररक्षणात बदल केलं.

#ICCWorldCup हातातोंडाशी आलेला सामना गमावणाऱ्यात हिंदुस्थानचा पहिला नंबर

दरम्यान, वर्ल्डकपपूर्वी झालेल्या दुसऱ्या सराव लढतीत महेंद्रसिंग धोनीचा जुना अवतार पुन्हा दिसला. धोनीने 78 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकार ठोकत 113 धावांची दणदणीत खेळी केली. धोनीसह राहुलने 108 धावांची खेळी केली. हा सामना हिंदुस्थानने 95 धावांनी जिंकला.