गिरणी कामगारांना खूशखबर ,ऑगस्टमध्ये 3800 घरांची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

म्हाडा’ने गिरणी कामगारांना खूशखबर दिली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईत कामगारांसाठी 3800 घरांची लॉटरी काढली जाणार असून त्यात श्रीनिवास मिलच्या 485 आणि बॉम्बे डाईंगच्या 3300 घरांचा समावेश आहे.

सुमारे पावणेदोन लाख गिरणी कामगारांना घर देण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. कामगारांच्या तुलनेत घरांची संख्या कमी आहे. शिवाय घरांसाठी जमीनच उपलब्ध होत नसल्याने एमएमआरडीएच्या माध्यमातून घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पनवेलमध्ये त्याच योजनेतून आठ हजार घरे बांधली, पण ती विनावापर पडून आहेत. या पार्श्वभूमीवर ‘म्हाडा’ची लॉटरी ही गिरणी कामगारांसाठी गुड न्यूज ठरू शकते.

आज ‘म्हाडा’च्या 217 घरांची लॉटरी काढण्यात आली. तेव्हा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी गिरणी कामगारांसाठी 3800 आणि कोकण मंडळाच्या 2500 घरांची लॉटरी काढणार असल्याची घोषणा केली. म्हाडाच्या 217 घरांसाठी तब्बल 66 हजार अर्ज आले होते.