फाळणी झाली तेव्हाच तुम्हाला तुमचा हिस्सा दिला- ओवेसींवर भाजपचा पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आम्ही हिंदुस्थानात भाडेकरू नाही, हिस्सेदार आहोत असे वक्तव्य करून भाजपवर वार करणारे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना रविवारी भाजपने सुनावले आहे. 1947 मध्ये फाळणी झाली तेव्हाच तुमचा हिस्सा दिला आहे, अशा शब्दांत भाजपने पलटवार केला आहे.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यानंतर भाजप नेते माधव भंडारी यांनीही ओवेसी यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुस्लिमांना कुणीही भाडेकरू म्हटलेले नाही. मात्र जर ते हिस्सेदाराची भाषा करणार असतील तर 1947 मध्येच त्यांना त्यांची हिस्सेदारी मिळाली आहे, असे भंडारी म्हणाले.

काही जण चारितार्थ चालवण्यासाठी उलटसुलट वक्तव्ये करतात. धर्म, जातीच्या नावावर ते बेताल बडबड करतात. यामुळे कुणाचाच फायदा होत नाही. त्यांनी जबाबदारीने बोलावे, असेही भंडारी यांनी ओवेसी यांना सुनावले.