
सामना ऑनलाईन । जयपूर
देशात अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर कायम आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये तापमानात झालेल्या वाढीमुळे नागरिकांचा घाम निघत आहे. देशात एक असे शहर आहे जिथे तब्बल पन्नाशी पार पोहोचले आहे . राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात सलग दोन दिवस कमाल तापमान 50 अंशांपेक्षा जास्त नोंद झाली आहे. सोमवारी चुरूमध्ये 50.3 अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
हवामान विभागानुसार पश्चिम राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये भीषण उष्णतेची लाट दिसून आली. याचबरोबर पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आणखी काही दिवस कायम राहणार आहे.
India Meteorological Department: 50.3 degrees Celsius is the maximum temperature recorded in Churu, Rajasthan, today. pic.twitter.com/lSCSW1Rv7r
— ANI (@ANI) June 3, 2019




























































