सिंधुदुर्ग,गोव्यात मृदगंध दरवळला, गडगडाटासह पावसाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मालवण

मालवण शहर आणि परिसरात सकाळी साडेसहा वाजल्या पासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आमचे वार्ताहर अमित खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार मालवणात ढगांचा गडगडाट व लखलखाट सुरू आहे. मालवणाप्रमाणेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागातही दमदार पाऊस सुरू असल्याचेही समजते आहे.

सिंधुदुर्गाप्रमाणेच गोव्यामध्येही सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आमचे वार्ताहर देवेंद्र वालावलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गडगडाटासह गोव्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या गोवेकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. गोव्यामध्ये आजपासून शाळा सुरू होत असून शाळेच्या पहिल्याच दिवशी पावसाला सुरूवात झाली आहे.