बॉक्स ऑफिसवर ‘भारत’ चित्रपटाचा जलवा, तुफान कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलीवूडमधील दबंग अभिनेता सलमान खान याच्या ‘भारत’ चित्रपटाने गेल्या आठवड्यात जोरदार ओपनींग केलं आहे. विशेष म्हणजे दमदार ओपनींग करण्यात त्याने स्वत:च्याच चित्रपटांचा विक्रम मोडीत काढला आहे. सुलतान (2012) आणि प्रेम रतन धन पायो (2015) चित्रपटांपेक्षा अधिक चांगली कमाई ‘भारत’ने केल्याचे पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाची कहानी फाळणीच्या वेळी वडील व बहिणीपासून वेगळ्या झालेल्या मुलावर आधारित आहे. दमदार ट्रेलरवरून हा चित्रपट सलमानच्या चाहत्यांव्यतिरिक्त सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी कुतुहलाचा ठरला.
5 जून रोजी चित्रपट प्रदर्शनादिवशीच ‘वर्ल्ड कप’चा हिंदुस्थान विरूद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होता. तरीही प्रेक्षकांनी चित्रपटाला प्रतिसाद चांगला प्रतिसाद दिला. अनेख ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड देखील झळकले. चित्रपटाच्या यशानंतर निर्माते देखील खूप खूश आहेत.

उत्सवांच्या काळात चित्रपटगृहाचे मालक तिकिटांचे दर वाढतात. अशा प्रकारे दर वाढवल्यास प्रेक्षक चित्रपटांकडे वळत नाहीत. त्यामुळे तिकिटांचे दर वाढवू नये अशी विनंती सलमानने केली होती. तरी काही ठिकाणी चित्रपटाचे दर जास्त होते. असे असताना देखील प्रेक्षकांनी ‘भारत’साठी गर्दी केली. सलमानचे मौत का कुआ मधील दृश्य खिळवून ठेवणारे आहे. तर ‘स्लो मोशन’ गाणं देखील चांगलेच हिट ठरलं आहे. भारतच्या निमित्ताने सलमान-कतरिना जोडीची केमिस्ट्री पडद्यावर यशस्वी ठरताना दिसत आहे.