
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
यूपीए सरकारच्या कार्यकाळात झालेल्या हकाई काहतूक घोटाळ्यातील ‘एअर इंडिया’शी संबंधित प्रकरणांबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांची ‘ईडी’कडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. पटेल यांनी सोमवारी सकाळी आपल्या वकिलांसोबत ‘ईडी’चा कार्यालयात हजेरी लावली. पटेल यांना ईडीकडून गेल्या शनिवारी समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी ते हजर राहिले नाहीत. त्यांनतर ईडीने पटेल यांना 10 किंवा 11 जून रोजी हजर राहण्यासंबंधी समन्स बजावले होते.






























































