
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
बिहारमध्ये मेंदूज्वराने आतापर्यंत 108 बालकांचा मृत्यू झाला आहे. भाजप खासदाराने या मृत्यूसाठी 4जी जबाबदार असल्याचे बेताल विधान केले आहे. अजय निषाद असे या खासदाराचे नाव असून ते मुझफ्फरपूरचे खासदार आहेत.
Muzaffarpur MP Ajay Nishad on deaths due to Acute encephalitis syndrome: There's rise in number of patients this year compared to last year. Biggest reason can be very high temperatures this yr. Some say it happened after eating Litchi, some say it happened due to malnutrition. pic.twitter.com/4EF59JkUgO
— ANI (@ANI) June 17, 2019
निषाद यांनी या मृत्यूसाठी गाव, गरिबी,गंदगी म्हणजेच घाण आणि गरमी म्हणजेच उष्णता या बाबी कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिमागासलेपण हे या मृत्यूंसाठी कारणीभूत असल्याचे विधानही निषाद यांनी केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज मुझफ्फरपूरचा दौरा केला,यावेळी त्यांना बऱ्याच विरोधाचा सामना करावा लागला.
Chief Minister of Bihar, Nitish Kumar visited Sri Krishna Medical College and Hospital in #Muzaffarpur, today; 89 children have died due to AES at the hospital. pic.twitter.com/g6HwvQMrs3
— ANI (@ANI) June 18, 2019
निषाद यांनी या दौऱ्याबाबत बोलताना म्हटले की ‘ नितीश कुमारांनी मुझफ्फरपूरचा दौरा केल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करीत आहे, सरकारने मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या कमी कशी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.’
निषाद यांनी 4जी मुळे या बालकांचा मृत्यू होत असल्याच्या केलेल्या विधाबाबत बोलताना सांगितलं की ‘सरकारने मृत्यू कमी करण्यासाठी या चार मुद्दावर लक्ष देण्याची गरज आहे. गाव, गरिबी,गंदगी म्हणजेच घाण आणि गरमी म्हणजेच उष्णता या चार बाबींचा या बालकांच्या मृत्यूशी संबंध आहे, कारण जी बालके दगावली आहेत किंवा रुग्णालयात उपचार घेत आहे ती अतिशय गरीब घरातील आहे. यातील अनेक बालके ही अनुसूचित जातीतील असल्याने त्यांचे जीवनमान हे अत्यंत हलाखीचे आहे.’ बालकांचे जीवनमान उंचावण्याची गरज असल्याचे निषाद यांनी म्हटले आहे. संयुक्त जनता दलाचे खासदार दिनेशचंद्र यादव यांनीही निषाद यांच्याप्रमाणे मेंदूज्वराने मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांच्या मृत्यूला भयंकर उष्णता जबाबदार असल्याचा तर्क मांडला आहे. उन्हाळ्यामध्ये बालकांच्या मृत्यूची संख्या वाढते आणि पावसाळा सुरु झाला की कमी होते असे यादव यांचे म्हणणे आहे.
























































