दुष्काळाने होरपळल्यानंतर नदीला आला पूर, गावकऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पारध

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारधच्या रायघोळ नदीला तब्बल तीन वर्षांनंतर पुर आला अन् गावातील लहान पासून थोरामोठ्यांनी रात्रीच नदीवर पूर पाहण्यासाठी गेले. एखाद्या आनंदोत्सवाप्रमाणे नदीवर एकच गर्दी केली. कारण ही तसेच होते नदीच्या पात्रात एवढे पाणी पाहायला तीन वर्षे उलटले.

गेली चार ते पाच वर्षापासून पारधसह परिसरातील नागरिकांना दुष्काळ अन् दुष्काळ कधी काळी हिरवेगार नदंनवन असलेल्या या भागाचे अगदी उजाड माळरान झाले. त्यात मृगनक्षत्र कोरडा गेला कसेबसे करुन बी-बियाणे खरेदी करुन ठेवले. मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यात रविवारी रात्री सायंकाळी आभाळ दाटुन आले आणि लगेच पावसाला सुरूवात झाली. थोडासा पाऊस पडल्या नंतर एक तासांनी एकाएकी रायघोळ नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. बघता बघता नदी दुथडी वाहु लागली. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी आणि लहान मुलापासुन पुरुष महिलासह सर्वांनी एकच गर्दी केली. एखाद्या उत्सवासारखे वातावरण नदीच्या तीरावर निर्माण झाले. त्यानंतर 24 जून रोजी पारधसह परिसरातील वालसावंगी, धावडा, शेलुद, लेहा, पारधखुर्द, पिंपळगाव रे. आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडला. संपुर्ण परिसरात नदी नाले भरुन वाहु लागले आजही पारध येथील रायघोळ नदीला पुर आला असुन सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.