देवगड दिंडीचे नेवासा येथे उत्साहात स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नेवासा 

देवगड दिंडीतील पहिला रिंगण सोहळा माऊलीची कर्मभूमी असलेल्या नेवासेनगरीत सोमवारी दुपारी झाला. संपुर्ण महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या आषाढीवारी पायी दिंडीचे नेवासेच्या माऊलीच्या नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दुपारी आगमन झालेल्या या दिंडीने “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात देवगड दिंडीचे पहिले रिंगण झाले. वारकऱ्यांच्या या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

या दिंडीचे नेवासा नगरीत नेवासा एस.टी. स्टँड प्रांगणात दिंडीचे ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्यासमवेत आगमन झाल्यानंतर एस.टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. भगवे ध्वज एस.टी. स्टँड परिसरात लावण्यात आले होते. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत सुमारे चौदाशे भाविक दिंडीत सहभागी झाले आहेत. दिंडीने वारकरी संप्रदायाची पताका हाती घेत रिंगण सादर केले. त्यानंतर वारकऱ्यांचे रिंगण,एस.टी. कर्मचाऱ्यांचे रिंगण सादर करण्यात आले.बदामबाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक सादर करून विठ्ठल रुख्मिणीचा देखावा यावेळी सादर केला. यावेळी एस.टी. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते दिंडीची महाआरती करण्यात आली