महिनाभरात दुधाच्या पिशव्यांचा पुनर्वापर सुरू, पिशवीचे 50 पैसे मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

राज्यात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्यास सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात दरदरोच एक कोटी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर पडतात. त्यामुळे दूध पिशव्यांचाही पुनर्वापर व्हावा यासाठी दूध विक्रेत्यांकडे 50 पैसे डिपॉझिट ठेवल्यानंतर दूध पिशवी ग्राहकांना मिळणार आहे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी रिकामी दूध पिशवी परत केल्यानंतर हे 50 पैसे ग्राहकांना परत मिळणार आहेत. येत्या महिनाभरात रिकामी दूध पिशवी परत केल्यानंतर 50 पैसे मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे 31 टन दूध पिशव्यांचा कचरा कमी होईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.

प्लॅस्टिकबंदीबाबत आमदार मंगलप्रभात लोढा, सुनील शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. याला उत्तर देताना पर्यावरणमंत्री म्हणाले, राज्यात प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती केली, विभागवार बैठका घेतल्या, आढावा बैठका घेतल्या, सभा घेतल्या अशी माहिती कदम यांनी यावेळी दिली. वापी आणि गुजरात या मार्गाने 80 टक्के प्लॅस्टिक महाराष्ट्रात येत होते. मी स्वतः महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर जाऊन ट्रक पकडले, गोडाऊनकर धाडी टाकल्या, एक लाख 20 हजार मेट्रिक टन प्लॅस्टिक गोळा केले, 986 मेट्रिक टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. आता त्या प्लॅस्टिकवर 24 कंपन्या दिवसाला 500 ते 550 मेट्रिक टन प्लॅस्टिक रिसायकल करण्याचे काम करत आहेत.

सिमेंट निर्मितीसाठी प्लॅस्टिक

एल ऍण्ड टी, अंबुजा सिमेंट अशा सिमेंट कंपन्यांना तीन हजार मेट्रिक टन प्लॅस्टिक देऊन त्याचा कापर सिमेंटमध्ये करण्यात यावा अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. रस्ते बनविण्यासाठी कापरल्या जाणार्‍या मटेरिअलध्येही प्लॅस्टिकचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यामध्ये सात टक्के वरचा थर प्लॅस्टिकचा दिला जावा, असे आदेश केंद्र सरकारने रस्ते विकास विभागाला दिले असल्याची माहिती कदम यांनी सभागृहात दिली.

4 कोटींचा दंड वसूल

11 हजार 200 टन प्लॅस्टिक कचरा निर्माण व्हायचा तो आता फक्त 600 टन इतका निर्माण होत आहे. पूर्णतः प्लॅस्टिकबंदी करण्याची शासनाची भूमिका असल्याची माहिती पर्यावरणमंत्र्यांनी दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत केलेल्या संयुक्त कारवाईत 6 हजार 369 दुकानांवर कारवाई करण्यात आली असून 4 कोटी 12 लक्ष 20 हजार 588 एकढा दंड गोळा केला.

प्लॅस्टिकच्या पिशव्यांची गुजरात, दमण येथून चोरटी वाहतूक