
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
संविधानात कलम 370 ची तात्पुरती सोय आहे त्य़ामुळे ते कायमस्वरुपी राहू शकत नाही, असे आज गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे. दोन दिवसांच्या जम्मू-कश्मीर दौऱ्यानंतर दिल्लीत परतलेल्या अमित शहा यांनी आज लोकसभेत आपल्या दौऱ्याची माहिती दिली. लोकसभेत विरोधकांनी कलम 370 विषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे सांगितले आहे.
बार बार जम्मू-कश्मीर में 370 की दुहाई देने वाले ये भूल जाते हैं कि 370 के आगे अस्थायी
शब्द भी लगा है।370 हमारे संविधान का अस्थायी मुद्दा है। pic.twitter.com/5azn5uPbI9
— Amit Shah (@AmitShah) June 28, 2019
‘कलम 370 हे तात्पुरते आहे. संविधानात कलमासमोर तसे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हे कलम कायमस्वरुपी नाही. कलमापुढे लिहलेल्या या शब्दाकडे दुर्लक्ष केले जाते किंवा जाणूनबुजून ते वाचलेच जात नाही. शेख अब्दुल्ला यांच्या सहमतीनेच हे झालेले आहे. हिंदुस्थानला सुरक्षित, समृद्ध, सुशिक्षित बनविण्याचा आमच्या इरादा असून त्यात कोणताही बदल झालेला नाही’, असे लोकसभेत अमित शहा यांनी सांगितले.

























































