परभणीत सर्वदूर दमदार पाऊस; पेरणीच्या कामाला वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, परभणी

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला वरुण राजा बरसण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री परभणी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आज शनिवारी दुपारीनंतर अनेक तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चांगल्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या.

शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी किमान 70 मि.मी. पावसाची आवश्यकता असते. जून महिना संपत आला तरीही वरुण राजा न बरसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. सध्या सर्वत्र दमदार पाऊस हजेरी लावत असल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी आशा व्यक्त होत आहे. शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे उकाड्यापासून परभणीकरांची सुटका झाली. तापमानामध्ये मोठा फरक पडला आहे. या पावसामुळे शेतकरी समाधानी झाला असून पेरणीच्या कामास वेग आला आहे. बाजारपेठेमध्ये बी-बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे. परभणी जिल्ह्यात 1 जूनपासून आत्तापर्यंत 50.12 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. पेरणीयोग्य पाऊस अद्यापही बरसला नाही. तरीही शेतकऱ्यांनी पेरणीस उशिर झाल्यामुळे याच दरमदार पावसावर पेरणी सुरु केली आहे. कापूसाची लागवड तर सोयाबीन, मूग, उडीद, हॅब्रिड, मका आदी पीकांची पेरणी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. परभणी जिल्ह्यात यंदा विक्रमी तापमानाची नोंद झाल्यामुळे वरुण राजाची प्रतिक्षा करण्यात येत होती. तसा पावसाळ्यातील पाऊस तीन आठवडे लांबला आहे.

जून महिना संपत असताना तापमानाचा पारा 38 ते 40 अंशावरच कायम असल्याने कुलर आणि पंखे बंद नव्हते. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे परभणीकरांची उकाड्यापासूनची सुटका होण्यास मदत झाली आहे. पाऊस झाल्यानंतर हवेत गारवा निर्माण झाला आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सर्वाधिक (72 मि.मी.) पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विशेषत: परभणी आणि पालम तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत अद्यापही बळीराजा असून येत्या 1 ते 4 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता तर पुढील दोन दिवसात वाNयाचा वेग वाढण्याची शक्यतेचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणाी साचले होते. परभणी शहरातील अनेक नाले तुंबले असून मनपा प्रशासनास सफाईचे काम हाती घ्यावे लागले आहे.