आजपासून सिंहगड, मनमाड, सेवाग्राम एक्प्रेस पाच मिनिटे आधी सुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक आज सोमवार, 1 जुलैपासून लागू होणार असून नव्या वेळापत्रकानुसार सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेसने प्रवासात 65 मिनिटे, तर कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसने प्रवासात 120 मिनिटांचा वेग वाढवला आहे. सिंहगड, मनमाड, सेवाग्राम एक्स्प्रेस पाच मिनिटे आधी सुटणार आहेत.

नवीन वेळापत्रकामुळे 29 एक्स्प्रेस गाडय़ांचा वेग वाढणार आहे. वेग वाढल्याने सोलापूर-कोल्हापूर प्रवासात 65 मिनिटे, तर कोल्हापूर-सोलापूर प्रवासात 120 मिनिटे वाचणार आहेत. मध्य रेल्वेच्या 30 पॅसेंजर गाडय़ांचाही वेग 5 ते 35 मिनिटापर्यंत वाढवण्यात आला आहे. सीएसएमटी-गडग एक्स्प्रेस (11139/11140) 1 जुलैपासून आठवड्यातील सहा दिवस धावेल. सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस (11051/11052) आता सुपरफास्टच्या स्वरूपात 22133/22134 या नव्या रेल्वे क्रमांकासह धावणार आहे. ज्या प्रवाशांनी आधीच आपले तिकीट बुक केले आहे त्यांच्याकडून प्रवासाच्या वेळी सुपरफास्टप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.

रेल्वेच्या वेळात बदल

डाऊन रेल्वे मार्गावरमध्ये – 11009 मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस दुपारी 02.30 वाजता न सुटता दुपारी 02.25 वाजता सीएसएमटी येथून रवाना होईल. 12117 एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस दुपारी 03.00 वाजता निघण्याऐवजी दुपारी 02.55 वाजता एलटीटी येथून निघेल. 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस दुपारी 03.00 वाजता निघण्याऐवजी दुपारी 02.55 वाजता सीएसएमटी येथून रवाना होईल. 16381 मुंबई-कन्याकुमारी एक्स्प्रेस सीएसएमटी येथून दुपारी 03.45 वाजता निघण्याऐवजी दुपारी 03.35 वाजता निघेल. 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून सकाळी 07.55 वाजता सुटण्याऐवजी सकाळी 08.05 वाजता सुटेल.