सोलापुरात वीज पडून तिघांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी साधारण दोनच्या सुमारास घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.

पंतूसिंग जीवनसिंग रजपूत (वय वर्षे 40), संकेत शिवानंद चौरमोले (वय वर्षे 17), पार्वती मलप्पा कोरे (वय वर्षे 44) यांचा मृत्यू झाला. तर रविकांत राजकुमार मुळे (वय वर्षे 93) व धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे (वय वर्षे 92) हे दोघे जण जखमी आहेत. जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मंद्रुप गावावर शोककळा पसरली आहे.