
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत सध्या पावसाने रेल्वे वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. रेल्वेस्थानकात पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. पण, सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तर चक्क ट्रेनच्या आत पाऊस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
एका प्रवाशाने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लांब पल्ल्याच्या एका गाडीतून पावसाचं पाणी गळत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ बेंगळुरूहून पाटण्याला जाणाऱ्या संघमित्रा एक्सप्रेसमधील आहे. विशेष म्हणजे हा प्रकार एसी कोचमधला आहे. हा व्हिडीओ 29 जून रोजी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पाहून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर टीका करायला सुरुवात केली आहे. रेल्वेच्या सर्वोत्तम कोचमध्ये हा प्रकार असेल तर इतर ठिकाणचा विचार करणंच नको, असा सूर या प्रतिक्रियांमधून उमटताना दिसत आहे.
संगमित्रा सुपर फ़ास्ट A1 का हाल, यात्री परेशान, pic.twitter.com/6pSzqKPjmB
— suyagya rai (@RaiSuyagya) June 29, 2019

























































