पाकिस्तानातील हिंदुस्थानच्या दूतावासाच्या आवारात बेकायदेशीर अतिक्रमण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कराची

पाकिस्तानमधील कराची येथे असलेल्या हिंदुस्थानच्या बंद पडलेल्या दूतावासात बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणाबाबत हिंदुस्थानने पाकिस्तानकडे तीव्र शब्दात आक्षेप नोंदविला असून पाकिस्तानचे उपउच्चायुक्त हैदर शहा यांना समन्स बजावले आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

कराचीमध्ये असलेले हिंदुस्थानी दूतावास हे 1993 च्या बॉम्बस्फोटांनंतर बंद करण्यात आले होते. त्यानंतर हिंदुस्थानी दूतावासाची सहा मजली इमारत पूर्णत: बंद असून फक्त सुरक्षा रक्षक व त्यांची कुटुंबे त्या इमारतीच्या आवारात राहतात. मात्र नुकतंच काही समाजकंटकांनी या इमारतीच्या आवारात बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या प्रकरणी हिंदुस्थानने आक्षेप नोंदवला आहे.