
सामना ऑनालाईन । चेन्नई
राज्यसभेचे तमिळनाडूचे उमेदवार आणि एमडीएकेचे नेते वायको राजद्रोहच्या एका प्रकरणात दोषी आढळले आहेत. 2009 सालच्या या प्रकरणात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शांती यांनी वायको यांना एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
वायको यांनी आपले पुस्तक “आय अक्युज’ या तमिळ भाषांतर आवृत्तीच्या प्रकाशन समारंभावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा ठपका असलेल्या लिट्टे या संघटनेला सहानुभुती दर्शवली होती. या प्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप होता. तो आता सिद्ध झाला असून त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
यावर वायको म्हणाले की “तमिळ जनतेच्या हत्येवर बोलल्याने मला जर शिक्षा मिळत असेल तर त्याचे मी स्वागत करतो. तसेच एक वर्षच काय मला जन्मठेप जरी मिळाली तीही मी स्विकारेन.” त्यासाठी मी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.




























































